मुंबई : राज्यातलं महाविकासआघाडी सरकार तीन पक्षाचं असलं तरी, इतर दोन पक्ष केवळ नामधारी आणि सत्तेचं केंद्र केवळ एकाच पक्षाकडे आहे, अशी टीका सातत्याने होत आहे. महाविकास आघाडी सरकार हे केवळ शरद पवार चालावतात, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. या सर्व आरोपांना मी जुमानत नाही. मुळात शरद पवार यांच्याशी आमची बैठक कशी होते. हे कुणालाही माहित नाही. हे उगाच बिनबुडाचे आरोप करतात, असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. मी अशा आरोपांचा विचार करत नाही. ज्यांना बोंबलायचं आहे त्यांना बोंबलू द्या. आमचं सरकार उत्तम सुरु आहे, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच्या वातावरण कसं असत, याचा उलगडा उद्धव ठाकरे यांनी केला. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री होती. त्यामुळे ते वडीलधाऱ्यांप्रमाणे वागतात. मार्गदर्शन करतात. पवारांच्या वागणुकीत मस्ती किंवा रुबाब नसतो. ते मुद्देसूद बोलतात. त्यामुळे सत्तेची सूत्रे पवारांकडे आहेत असे नाही आम्ही सगळे एकाच सूत्रात आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. हिंदुत्वाच्या, मराठीच्या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. असे खेळाडू कोणत्या कोणत्या मैदानात कोणकोणते खेळ करतात हे आतापर्यंत जनतेने अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी याचा खेळ, कधी त्याचा खेळ, असे काही खेळाडू खेळ करतात. दोन वर्ष लॉकडॉऊन आणि कोरोनात गेले. यामध्ये नाटक, थिएटर, मनोरंजन पूर्ण बंद होतं, त्यामुळे फुकट करमणूक होत असेल तर का नाही पाहायची? असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

