Share

IPL 2022 : CSKचा आळशी कॅप्टन? रवींद्र जडेजानं ‘कॅप्टनशीप’ सोडली की त्याच्याकडून काढून घेतली? वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सला सलग आठ पराभवानंतर पहिला विजय मिळाला. या मोठ्या बातमीसोबतच चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली. रवींद्र जडेजाने आपले कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीच्या हातात सोपवले. धोनी ३७ दिवसात पुन्हा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला.

चेन्नई संघाने ट्विटरवर सांगितले, की रवींद्र जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि धोनीला चेन्नई संघाची सूत्रे हाती घेण्याची विनंती केली. धोनीने संघाच्या हितासाठी ही विनंती मान्य केली आणि स्वतः कर्णधारपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण एका वृत्तसंस्थेनुसार संघाच्या आतील बातमी समोर आली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रमोटर आणि व्यवस्थापन रवींद्र जडेजाच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नाखूष होते आणि त्यामुळेच त्याने कर्णधारपद गमावले. ”या हंगामात, जडेजा मैदानावर आळशी, दबलेला दिसत होता. त्याच्या कर्णधारपदाला कोणतीही किनार नव्हती. संघाचे कर्णधारपद सांभाळताना तो आत्मविश्वासाचा अभाव दाखवत होता. हे त्याच्या देहबोलीतूनही दिसून येत होते”, असे एका चेन्नई संघासोबत असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले.

जडेजाच्या नेतृत्वावरही अनेक दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. धोनीने आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस आधी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले होते आणि त्याच्या जागी जडेजाला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले. त्यानंतर या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक होता. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने चार विजेतेपदे जिंकली होती. त्याने हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी कर्णधारपद का सोडले.

अचानक बनला कर्णधार आणि…

अचानक कर्णधारपदाच्या दबावाचा परिणाम जडेजावर स्पष्टपणे दिसून आला आणि एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून त्याची कामगिरी घसरली. या कारणास्तव, गतविजेता चेन्नई गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून त्यांच्या प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यताही खूपच कमी आहे. जडेजाचा स्वतःचा फॉर्मही या मोसमात खूपच खराब आहे. त्याने २२.४०च्या सरासरीने केवळ ११२ धावा केल्या आहेत आणि गेल्या हंगामाप्रमाणे यावेळीही त्याने संघासाठी मॅच फिनिशरची भूमिका पार पाडली नाही. त्याचबरोबर जडेजाने ८ सामन्यात केवळ ५ विकेट घेतल्या.

रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली यंदा चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली. संघाने आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत संघ व्यवस्थापनाला जडेजासोबत अधिक जोखीम पत्करणे शक्य नव्हते. त्यामुळे संघाचे कर्णधारपद पुन्हा धोनीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला गेला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!