🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा तसेच महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. तसेच मशिदीवरील भोंग्याबाबतही त्यांनी अल्टीमेटम दिला होता. यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत असताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी राज ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
“मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी आदरणीय शरद पवार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारे, आदर्श नेतृत्व म्हणून संबोधणारे राज ठाकरे अचानक यु टर्न घेत साहेबांना जातीयवादी ठरवत विपरीत भूमिका घेतात तेव्हा पाणी कुठेतरी मुरतेय हे लगेच लक्षात येते. जातीयवाद नेमका कोण करतोय हे सर्वांना माहिती आहे. राज ठाकरेंनी नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.”, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ तारखेचा अल्टीमेटम दिला होता. तर कालच त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असं म्हणत राज ठाकरे यांनी माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलीस यंत्रणा कडक पावलं उचलण्याच्या तयारीत असताना राज ठाकरेंनी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 GT vs PBKS : गेला..गेला..GONE..! लियाम लिव्हिंगस्टोननं ठोकला ११७ मीटर लांब षटकार; पाहा VIDEO!
- IPL 2022 GT vs PBKS : धवनची गब्बर खेळी अन् लिव्हिंगस्टोनचा फिनिशिंग टच..! सुसाट गुजरातला पंजाबनं रोखलं!
- “जिथं भोंग्यावर अजान तिथं….”; राज ठाकरेंचा मनसैनिकांना थेट आदेश!
- IPL 2022 GT vs PBKS : रबाडानं उडवली गुजरातची भंबेरी; पंजाबला १४४ धावांचं आव्हान!
- “राज ठाकरेंना जामिन मिळेल अशी कलमं लावली गेली” – इम्तियाज जलील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
