🕒 1 min read
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळावा तसेच महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत मशिदीवरील भोंग्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला होता. मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून ऐकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यातच काल त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असं म्हणत राज ठाकरे यांनी माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. यासंदर्भातच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर (Sumit Khambekar) यांनी ट्वीट करत इशारा दिला आहे.
“ज्यांनी आमच्या विचारांना पाठिंबा दिला त्यांचे मनःपूर्वक आभार,आमच्यासाठी ‘राज’ आदेश अंतिम!”, असे ट्वीट सुमित खांबेकर यांनी केले आहे. दरम्यान महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेत पुन्हा एकदा मशिदीवरील भूमिका मांडली होती. त्यामुळे शहरात संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ज्यांनी आमच्या विचारांना पाठिंबा दिला त्यांचे मनःपूर्वक आभार,आमच्या साठी राज आदेश अंतिम…!
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) May 4, 2022
दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेबद्दल माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. त्यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलीस यंत्रणा कडक पावलं उचलण्याच्या तयारीत असताना “देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे.”, असे आदेश त्यांनी पत्रकाद्वारे दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “शरद पवारांना आदर्श नेतृत्व संबोधणारे राज ठाकरे अचानक यु टर्न…”, राजेश टोपेंचा घणाघात
- IPL 2022 GT vs PBKS : गेला..गेला..GONE..! लियाम लिव्हिंगस्टोननं ठोकला ११७ मीटर लांब षटकार; पाहा VIDEO!
- IPL 2022 GT vs PBKS : धवनची गब्बर खेळी अन् लिव्हिंगस्टोनचा फिनिशिंग टच..! सुसाट गुजरातला पंजाबनं रोखलं!
- “जिथं भोंग्यावर अजान तिथं….”; राज ठाकरेंचा मनसैनिकांना थेट आदेश!
- IPL 2022 GT vs PBKS : रबाडानं उडवली गुजरातची भंबेरी; पंजाबला १४४ धावांचं आव्हान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
