नागपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोरील भोंग्याबाबत ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे नागपूर आणि ग्रामीण भागात अनेक मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.
नागपूरमधील जामा मशीदमध्ये आज शांततेत आणि कमी नियमांनी घालून दिलेल्या आवाजात अजान करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या नियमानुसार आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे येथील स्थानिकांनी म्हटले. तसेच राज ठाकरे यांनी अल्टीमेटम दिला म्हणून नाही, तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार हा नियम पाळण्यात आल्याचेही येथील मौलवींनी म्हटले आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी काल एक पत्रक प्रसिद्ध करत “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असं म्हणत माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आमच्यासाठी ‘राज’ आदेश अंतिम”, मनसे नेत्याचा ट्वीट करत इशारा; औरंगाबादेत संघर्ष पेटण्याची शक्यता
- “शरद पवारांना आदर्श नेतृत्व संबोधणारे राज ठाकरे अचानक यु टर्न…”, राजेश टोपेंचा घणाघात
- IPL 2022 GT vs PBKS : गेला..गेला..GONE..! लियाम लिव्हिंगस्टोननं ठोकला ११७ मीटर लांब षटकार; पाहा VIDEO!
- IPL 2022 GT vs PBKS : धवनची गब्बर खेळी अन् लिव्हिंगस्टोनचा फिनिशिंग टच..! सुसाट गुजरातला पंजाबनं रोखलं!
- “जिथं भोंग्यावर अजान तिथं….”; राज ठाकरेंचा मनसैनिकांना थेट आदेश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

