मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे आज (मंगळवार) दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेले काही दिवस भाजपचे किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश आहे.दरम्यान, राऊतांच्या पत्रकार परिषदेपूर्वी अनेक नेत्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
* इशू डायव्हर्ट करणं शरद पवार आणि ठाकरे यांना पेड मीडिया एजन्सीने दिलेला सल्ला- किरीट सोमय्या

इशू डायव्हर्ट करणं शरद पवार आणि ठाकरे यांना पेड मीडिया एजन्सीने दिलेला सल्ला आहे. आता आम्ही कोविड सेंटर घोटाळा समोर आणला. त्यात ठाकरेही फसत आहेत आणि संजय राऊत यांचे पार्टनरही फसत आहे. त्यामुळे डायव्हर्ट करणे हे त्यांची नाटकं आहे. किरीट सोमय्या यांच्यावर १० ते १२ केसेस दाखल केले आहेत ११० केसेस दाखल केल्या तरी मी घाबरणार नाही. संजय राऊत यांनी आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. टाईमपास आणि नौटंकी नंतर करा, असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले आहे.
* संजय राऊत जो कांगावा करताय हा जनतेला देखील कळतोय- प्रसाद लाड

संजय राऊत भरकटलेले असून त्यांना मी काल ‘गेट वेल सुन’चा मेसेज पाठवला. आज पत्रकार परिषद झाल्यावर त्यांना मी पुष्पगुच्छ पाठवणार आहे. तसेच संजय राऊत यांना शिवसेनेमधून पाठींबा नाही, असेही लाड म्हणाले. पुढे ते म्हणाले की,‘जबरदस्तीने शिवसेना नेत्यांना एकत्रित करून पत्रकार परिषद घेण्याचा संजय राऊत जो कांगावा करताय हा जनतेला देखील कळतोय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.
* आम्ही आता चॅनेलवर राहू मात्र, दुपारी ३ नंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील- सुप्रिया सुळे

एका कार्यक्रमात बोलत असतांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुम्ही तुमचं चॅनेल आमच्या कॉमेंट्सवर चालवता. मग तुम्ही आम्हाला पैसे द्यायला हवेत. तसेच आता जे काही करायचे आहे ते तीन वाजण्याच्या आत करु, कारण त्यानंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील. त्यामुळे दादा आपण आत्ताच आपली पब्लिसीटी करु, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
* चोर की दाढ़ी में चूगार- नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत संजय राऊत यांनी जर काहीचं केलेलं नाही. तर मग घाबरायचं कारण काय असे म्हंटले आहे. तसेच ‘चोर की दाढ़ी में चूगार’ असंही त्या संजय राऊतांना म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- BREAKING : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेआधी भाजप नेत्यांची अचानक दिल्लीवारी; चंद्रकांत पाटील, सोमय्या रवाना
- “आँधी जब आती है तब क्या-क्या लेके जाती है, हे त्याला माहित नाही”; प्रसाद लाड यांची संजय राऊतांवर टीका
- ‘चोर की दाढ़ी में चूगार’; संजय राऊतांवर नवनीत रणांची टीका
- Shiv Sena Press Conference : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार?
- ७५ वर्षीय आजोबांचा घोडीवर बसून सुसाट स्टंट ; तरुणाईला लाजवेल असा उत्साह

