🕒 1 min read
अलिबाग : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.
आता याचप्रकरणी अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आल्यानंतर अन्वय नाईकला तब्बल अडीच वर्षानंतर तरी न्याय मिळणार का? असा सवाल निर्माण होत आहे. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पत्रातून केला होता.
मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्यांच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे अलिबाग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर अर्णव गोस्वामींना अटक करण्यात आली. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे. आता अर्णब गोस्वामीला अलिबाग न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून त्याला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालय जामीनावर सुटका करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र पोलीस आमच्यासाठी उभी राहिली – अन्वय नाईकच्या घरच्यांनी मानले पोलिसांचे आभार!
अन्वय नाईक यांच्या पत्नीने व मुलीने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत. “अर्णब गोस्वामीने वडिलांच्या शेवटच्या प्रोजेक्टमध्ये कोट्यवधी रुपये अडकवून ठेवले. त्यामुळं अनेकांचे देणी रखडले. यासोबतच आम्हाला घाबरवण्यात आलं. दम देण्यात आला. मात्र, आज संकष्टीच्या दिवशी बाप्पाच्या कृपेने महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हा दिवस बघता आला.” अशी भावना व्यक्त केली.
“महाराष्ट्र पोलीस मराठी पत्नीच्या, मुलीच्या एवढंच नाही तर पत्नीच्या पाठीशी उभं राहून मोठी भूमिका बजावली आहे. अर्णब गोस्वामीसह फिरोज शेख आणि नितीश साढा या उद्योगपतींमुळे अन्वय नाईक यांना टोकाचं पाऊल उचलावं लागलं असून तेच जबाबदार आहेत.” असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडत आहेत – अनिल परब
- अर्नबच्या अटकेवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी – आशिष शेलार
- IPL मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना देखील संधी द्या ; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंना देखील दिलं अनोखं निमंत्रण!
- महाराष्ट्र पोलीस आमच्यासाठी उभी राहिली; अर्णबच्या अटकेनंतर अन्वय नाईकच्या पत्नीने मानले आभार!
- ‘उसूलों पे चला होगा !’, अर्णबच्या अटकेनंतर अमृता फडणवीसांचा शायरी स्टाईल टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
