Share

अर्नबच्या अटकेवर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी – आशिष शेलार

Published On: 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्र सरकारवर सतत निशाणा साधल्यानंतर रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही वाहिन्यांचा टीआरपी स्कॅमसमोर आला आणि अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली.

आता आणखी एका प्रकरणावरून आज त्यांना अचानक अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.

यावरून आता राजकारण पेटलं असून भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. अर्नबवर केलेली कारवाई म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. असे आरोप विरोधी पक्ष करत आहेत. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

इंदिरा काँग्रेसच्या आणीबाणीची शिवसेना समर्थक होती. आता शिवसेना काँग्रेसच्या आणीबाणीचे समर्थक नाही, तर व्यवस्थापक झाले आहेत, असा टोलाही आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे. तसेच सोनियांची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या विषयावर आपल्या पक्षांची भूमिका स्पष्ट करावी, असं आम्ही त्यांना आवाहन करत असल्याचंही शेलार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!