Share

शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्यासाठी अर्जून खोतकर यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Published On: 

जालना – थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची विज तोडणी थांबवावी यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. तसेच वीज तोडणी थांबवण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण स्वतः लक्ष देणार असल्याचे सांगितल्याची माहिती खोतकर यांनी दिली.

विज तोडणी संदर्भात शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. महावितरणने फेब्रुवारीपासून थकीत वीज बिले न भरणाऱ्या ग्राहकांची वीज तोडण्यास सुरूवात केली आहे. सध्या गहू, हरभरा, ज्वारीसारख्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याची प्रक्रीया सुरू आहे. अशा परिस्थितीत वीज तोडल्यास शेतकरी अडचणीत येईल. त्यामुळे महावितरणने सुरू केलेल्या वीज तोडणी तत्काळ थांबवणे गरजेचे असल्याचे खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळं संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. संपूर्ण देशात शेती हा एकमेव व्यवसाय सुरू होता. कठीण काळात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन देशाला अन्नधान्याचा पुरवठा केला. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच महावितरणकडून कृषी पंपांना वीज बिले पाठवली. असे नमूद करत खोतकर यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी थांवण्यासाठी ऊर्जामंत्री, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी देखील चर्चा केल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!