नवी दिल्ली: अफगाणिस्तान येथे तालिबान्यांनी ताबा मिळविल्याबद्दल ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबान्यांचे कौतुक केले आहे. यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे.
मौलान सज्जाद यांनी तालिबानचे कौतुक तर केले पण त्याचबरोबर कट्टरपंथीय तालिबानाल शुभेच्छा देताना या ‘हिंदी मुस्लिमाचा’ तुम्हाला सलाम असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे.
याअगोदर समाजवादी पक्षाचे खासदार खासदार शफीकुर रहमान यांनी तालिबानचे कौतुक करत त्याची तुलना भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली होती.’जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी लढला होता. त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. आपण त्यात हस्तक्षेप कसा करू शकतो? असा सवाल खासदार बर्क यांनी केला होता. यावरून त्यांच्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सडकून टीका केली. दरम्यान या प्रकरणी खासदार बर्क आणि इतर दोन जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत त्यांच्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबान्यांचे कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण’
- ठाकरे टॉप फाईव्हमध्ये! दरेकर म्हणाले, ‘कशाच्या आधारावर सर्व्हे केला? त्यांना काय अधिकार?’
- ‘..तेव्हा तुम्ही तर उकिरडे फुंकत हिंडलात’, संजय राऊत भाजपवर चिडले
- ‘उद्धव ठाकरे लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरणार’, संजय राऊतांचा विश्वास
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
