परभणी : कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरात असलेल्या कोविड सेंटरवरील व्यवस्थापनासह ऑक्सीजनसह आदी बाबात तातडीने निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सनियंत्रण अधिकार्यांची नियुक्ती करीत कामाच्या जबाबदारीचे आदेश सोमवारी दिले आहेत.
यात रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी डॉ. अरुण जर्हाड, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) बी.एच. बिबे, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) निवृत्ती गायकवाड यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.आय.ओ. सुनील पोटेकर, नायब तहसीलदार रामदास कोलगणे, तहसीलदार सुरेखा नांदे, नायब तहसीलदार अशोक मिरगे, तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह नायब तहसीलदार वंदना मस्के यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान नायब तहसीलदार दळवे, कैलास वाघमारे, शीतल कच्छवे, मीनाक्षी तमन्ना, श्रीरंग कदम, माधव वडजे, हरीश टाक आदींवर शहरातील कोविड सेंटरवर देखरेखीसह तेथील रुग्णांना लागणार्या ऑक्सीजनची व्यवस्था, पुरवठा, लसीकरण, आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवालासह चाचण्या करून घेण्याची जबाबदारी, वॉर रुम, हॉस्पिटल व्यवस्थापन, कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सगळे नियम फक्त जनतेसाठी…? अजित पवारांच्या बैठकीत कोरोनाचे नियम तुडवले गेले पायदळी
- जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती; हे मिम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही !
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- …म्हणून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; पवारांची ठाम भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

