मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असेल तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरची सेवा घेण्यासाठी त्यांची एम्समध्ये तत्काळ नियुक्ती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. ज्यांनी एबीबीएसच्या अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, इंटर्नशीप पूर्ण केली आहे. मात्र, अद्याप बंधपत्रित पूर्ण केलेला नाही अशा ४० जणांना नियुक्त करण्याचे आदेशही यावेळी उच्च न्यायालयाने दिले आहेत.
तसेच कोरोना रुग्णांची सुरू असलेल्या हेळसांडची दाखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल केली आहे. दरम्यान, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळेच देशातील अनेक राज्यांनी मोफत लस देण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अवघ्या १ धावेने पराभूत झाल्यानंतर भावूक रिषभ पंतचे विराटने केले सांत्वन; व्हिडीओ व्हायरल
- आखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात एका धावेने आरसीबीने दिल्लीवर केली मात
- रुग्णालयातील अग्नितांडव थांबेना;मुंब्रा येथे चार रुग्णांचा होरपळून मृत्यू
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- महिलेचा नातेवाईकाकडून विनयभंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

