मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये असणाऱ्या अनेक रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. हे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता पुन्हा ठाण्यातील मुंब्रा परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंब्रा येथील प्राईम हॉस्पिटलला पहाटे ३ च्या सुमारास आग लागली नेमके आगीचे कारण समजू शकले नाही. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदत कार्य चालू असून आग आटोक्यात आली आहे. अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
मुंब्रा येथील prime hospital ला रात्री 3 वाजता आग लागली आगी चे कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा संशय आहे. 3 जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मदत कार्य चालू असून आग आटोक्यात आली आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 28, 2021
मुंब्रा याठिकाणी असणाऱ्या कौसा परिसरात एम एस प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयामध्ये ही आग लागली आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर हे अग्नितांडव पाहायला मिळालं. घटनास्थळी मुंब्रा पोलीस, ५ रुग्णवाहिका, टोरेंट ऑफिशिअल्स, आरडीएमसी आणि फायर ब्रिगेड तीन फायर इंजिन, २ वॉटर टँकर आणि एक रेस्क्यू व्हेइकलसह घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.
रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. रुग्णालयात २० रुग्ण दाखल होते त्यातील ४ जणांचा या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रुग्णालयाला आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयाकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सदर आगीच्या घटनेत मृ्त्यूमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींना देखील १ लाख देण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

