औरंंगाबाद : गारखेडा परिसरातील भारतनगर येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेचा नातेवाईक असलेल्या युवकाने छेड काढुन विनयभंग केला. शेख मुजीब शेख बाबू (रा.भारतनगर, गारखेडा परिसर) असे विनयभंग करणा-या युवकाचे नाव आहे. पीडित महिला २५ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास आपल्या घरात असतांना शेख मुजीब याने पीडितेसोबत शारीरिक लगट करून तिचा विनयभंग केला. तसेच पीडितेच्या पायावर विट मारून जखमी केले. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शेख मुजीब शेख बाबु याच्याविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दोन मोबाईल लंपास
मुकुंदवाडी परिसरातील जयभवानीनगर येथील रहिवासी अमित राजेंद्र खांडरे (वय २२) यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधुन घरात शिरलेल्या चोरट्याने २५ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना २६ एप्रिल रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास घडली. अमित खांडरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोबाईल चोरून नेणाऱ्या चोरट्याविरूध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशी-विदेशी दारू विकणारा जेरबंद
लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाNया सचिन कोंडीराम जाधव (वय २९, रा.दत्तनगर, कांचनवाडी) याला गस्तीवरील गुन्हेशाखा पोलिसांनी जेरबंद केले. सचिन जाधव हा २६ एप्रिल रोजी कांचनवाडी येथील बिकानेर स्वीट मार्टजवळ अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री करीत होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ हजार ९५६ रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

