अहमदाबाद : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाने दिल्ली कॅपीटल्स संघाचा अवघ्या एका धावेने पराभव केला. आरसीबीने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजानी १७० धावांपर्यंत मजल मारली. आखेरच्या चेंडुवर षटकाराची गरज असताना रिषभ पंतने चौकार मारल्याने एका धावेने आरसीबीचा विजय झाला. या विजयानंतर आरसीबी संघ हा पुन्ह गुणतालीकेत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. धडाकेबाज खेळीसाठी आरसीबीचा फलंदाज एबी डिव्हीलियर्सला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
आखेरच्या चेंडुवर सहा धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने टाकलेला चेंडु रिषभ पंतने मारला. मात्र त्या चेंडुवर षटकाराऐवजी चौकार मिळाल्याने कर्णधार रिषभ पंत आणि हेटमायर हताश झाले. रिषभ पंत तर चक्क रडकुंडीला आला होता. मात्र यावेळी विरोधी संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याचे सांत्वन केले. यावेळी कोहलीने त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्याची सांत्वना केली. विराट सोबत आरसीबीच्या अनेक खेळाडूंनी रिषभ आणि हेटमायर यांचे सांत्वन केले. विराटच्या या कृतीने सर्वांचे मन जिंकले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहे.
What. A. Match!@RCBTweets prevail by 1 run. With 6 needed off the final ball, Pant hits a boundary but @DelhiCapitals fall short by a whisker. Siraj does well under pressure.
Hetmyer and Pant are distraught. https://t.co/NQ9SSSBbVT #DCvRCB #VIVOIPL pic.twitter.com/ju87soRG6B
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2021
आरसीबीने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठवाग करताना शिखर धवन(६) आणि स्टिव्ह स्मीथ(४) लवकर बाद झाले. यांनतर चौथ्या षटकात फलंदाजी साठी कर्णधार रिषभ पंत आला. त्याने संयमाने फलंदाजी करत संघाचा डावफलक हलता ठेवला. आखेरच्या चेंडुपर्यंत त्याने खेळपट्टीवर ठाण मांडले. मात्र शेवटच्या चेंडुवर ६ धावांची गरज असताना पंतने फटका मारला. मात्र तो फटका चौकार ठरला आणि दिल्लीचा पराभव झाला.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र आणि राज्यांसाठी लसींच्या वेगवेगळ्या किमती कशासाठी?;सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल
- आखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात एका धावेने आरसीबीने दिल्लीवर केली मात
- रुग्णालयातील अग्नितांडव थांबेना;मुंब्रा येथे चार रुग्णांचा होरपळून मृत्यू
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- महिलेचा नातेवाईकाकडून विनयभंग


