🕒 1 min read
नवी दिल्लीः स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे. एसबीआयने खातेधारकांना त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. जर हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला बँके संदर्भातील कामांना अडचणी निर्माण होऊ शकतात. बँकेने आता याची ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे. मात्र या तारखेच्या आत तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने अशी माहिती दिली आहे की, पॅन आधार लिंक करणं अनिवार्य आहे. असे न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि ट्रान्झॅक्शनसाठी कोट करता येणार नाही. तुम्ही www.incometax.gov.in वर भेट देऊन Link Aadhaar वर क्लिक करुन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. याकरता डेडलाइन 30 सप्टेंबर आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेच्या आत हे काम करणे गरजेचे आहे.
सरकारने पॅन कार्डला आधारची लिंक जोडणे आवश्यक केलं आहे. यासाठी तुम्ही SMS च्या माध्यमातून पॅन-आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला UIDPAN12 अंकी आधार क्रमांक10 अंकी पॅन कार्ड क्रमांक टाइप करुन 567678 किंवा 56161 या क्रमांकांवर पाठवावा लागेल. तसेच आयकर वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ द्वारे ऑनलाइन देखील तुम्ही हे काम करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
- उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा वाद : नाशिकमध्ये सेनेसह आघाडीत सर्वच पदाधिकारी नाराज
- कंगनाच्या ‘त्या’ याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध
- ९ ऑगस्ट ठरला ऑस्ट्रेलिया क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट दिवस
- नीरज चोप्राने बायोपिकसाठी दिली ‘या’ दोन अभिनेत्यांना पसंती
- दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव शिवाय टीम इंडिया लॉर्ड्सवर रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
