मुंबई : बॉलीवूडचे जेष्ठ अभिनेते अनुपन खेर हे त्यांच्या अभिनयासाठी सर्वदुर प्रसिद्ध आहे. बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही त्यांनी आभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयाव्यतीरिक्त ते वैयक्तीक जिवनात परखड मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. काही दिवसापुर्वीच त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात मत व्यक्त केले होते. मात्र त्यांनी पुन्हा एक ट्विट करत युटर्न घेतला आहे.
अनुपम खेर हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या समर्थनार्थ बोलताना ओळखले जायचे. मात्र काही दिवसापुर्वी त्यांनी मोदी सरकारवर टिका केली. यानंतर अनेकांनी अश्चर्य व्यक्त केले. तर अनेकांनी त्यांना ट्रोल केले. मात्र दोनच दिवसात त्यांनी युटर्न घेतला आहे. शुक्रवारी १४ मे रोजी त्यांनी एक ट्विट करत यु टर्न घेतला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पुन्हा अप्रत्यक्षपणे मोदींची स्तुती करत विरोधकावर तोफ डागली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहीले आहे की,’गलती उन्हीं से होती है, जो काम करते हैं, निकम्मों की ज़िंदगी तो, दूसरों की बुराई खोजने में ही, ख़त्म हो जाती है.’ असे लिहीले आहे.
गलती उन्हीं से होती है
जो काम करते हैं,
निकम्मों की ज़िंदगी तो
दूसरों की बुराई खोजने में ही
ख़त्म हो जाती है..:)— Anupam Kher (@AnupamPKher) May 14, 2021
काही दिवसापुर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी प्रथमच मोदी सरकारवर टिका करत म्हणाले की, ‘सध्याच्या परिस्थीतीत सरकारने लोकांचा जिव वाचवायला प्राधान्य दिले पाहिजे. केंद्र सरकारने आपल्या प्रतिमा बनवण्यापेक्षा देशातील नागरिकांच्या जिवाला प्राधान्य दिले पाहिजे असे म्हणाले.’ असे म्हणाले होते. तसेच त्यावेळी बोलताना देशातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीला केंद्र सरकारला जबाबदार धरणे गरजेचे आहे.’ असेही ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका ? वैद्यकीय तज्ञ म्हणतात…
- पाणी पितो म्हणाला आणि हातावर तुरी देऊन आरोपी पळाला
- करुणा मुंडेच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच सुरु झाला वाद, धार्मिक भावना दुखावल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
- रामगोपाल वर्मा १५ मे रोजी प्रदर्शित करणार स्वत:चा डिजीटल प्लॅटफॉर्म
- ‘कोरोनाच्या संकटकाळात फडणवीस आणि माझ्याइतकं काम कोणत्याच नेत्याने केलं नाही’


