Share

पाणी पितो म्हणाला आणि हातावर तुरी देऊन आरोपी पळाला

Published On: 

जालना: एकीकडे कोरोना तर दुसरीकडे गुन्हेगारी अशा परिस्थितीत सध्या पोलीसांची चांगलीच फजिती होत आहे. संचारबंदीत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर लक्ष द्यावं की चोरटे, गुंड यांच्या कडे लक्ष द्यावं, अशी परिस्थिती झाली आहे. अशातच जेल मधून आरोपी पळून गेल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यातून आरोपी फरार झाला आहे. पाणी प्यायला जातो असं सांगून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याची घटना घडली आहे.

जालना शहरातील औद्योगिक वसाहतीत कारखान्यांना मजूर पुरवठा करणाऱ्या ठेकेदार लक्ष्मण उंबरे यांचा गुरुवारी खून करण्यात आला होता. आरटीओ कार्यालयाच्या रस्त्यावर हा खून करण्यात आला होता. या लक्षमण उंबरे खून प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केले होती. श्याम उर्फ धम्मजित रमेश चिकटे हा पोट दुखतंय, असं सांगून पाणी पिऊन येतो असं म्हणत ठाण्याच्या परिसरातून पळून गेला आहे.

जालना शहरातील लक्ष्मण उंबरे यांचा गुरुवारी दुपारी खून झाला होता. या प्रकरणातील फरार झालेला श्याम ऊर्फ रमेश चिकटे व जितेंद्र रवी आरसूळ या दोघा संशयित आरोपींना गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी दुपारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर दोघांनाही चंदनझिरा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. यातील श्याम ऊर्फ रमेश चिकटे याने पोलिस ठाण्यातून पळ काढला. आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेज आधारे पथके तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!