मुंबई : पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडली आहे. भाजप खासदार वरुण गांधींनी कंगानाचा व्हिडीओ शेअर करत त्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
दरम्यान कंगना म्हणाली “सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणार हे माहित होतं. मात्र भारतीयांकडूनच भारतीयांवर वार होणार नाही हे ध्यानात ठेवायला हवं. स्वातंत्र्यासाठी नक्कीच त्यांचं मोलाचं योगदान आहे. मात्र ते स्वातंत्र्य नव्हतं ती भीक होती. जे स्वातंत्र्य मिळालं ते २०१४ सालामध्ये मिळालं” या वक्तव्यावर बॉलिवूड सेलिब्रिटीसंह अनेक नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. यावर भाजप खासदार वरुण गांधींनी कंगानाचा व्हिडीओ शेअर करत “या विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह असा सवाल उपस्थित केला आहे. वरुण गांधीनी एक ट्वीट केलंय. यात ते म्हणाले, “कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता तर थेट शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान! या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?” असा सवाल उपस्थित करत वरुण गांधींनी कंगानाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
कभी महात्मा गांधी जी के त्याग और तपस्या का अपमान, कभी उनके हत्यारे का सम्मान, और अब शहीद मंगल पाण्डेय से लेकर रानी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, नेताजी सुभाष चंद्र बोस और लाखों स्वतंत्रता सेनानियों की कुर्बानियों का तिरस्कार।
इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? pic.twitter.com/Gxb3xXMi2Z
— Varun Gandhi (@varungandhi80) November 11, 2021
तसेच अभिनेत्री स्वरा भास्करने देखील कंगनाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “त्या वक्तव्यावर टाळ्या वाजवणारे मूर्ख कोण आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे..” असं ट्वीट स्वराने केलंय.तर अभिनेता कमाल आर खान म्हणजेच केआरकेने देखील कंगनावर निशाणा साधला आहे. एक ट्वीट करत केआरकेने कंगनाला मूर्ख म्हंटलं आहे. कंगनाचं हे वक्तव्य ऐकून भगतसिंग, उधम सिंग स्वर्गात रडत असतील असं तो म्हणाला आहे. वादग्रस्त वक्तव्य करण्याची कंगनाची ही पहिली वेळ नव्हे या आधीदेखील कंगनाने अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत ज्यामुळे तिच्यावर टिका झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांनी घेतली आमदारकीची शपथ
- ठाकरे सरकारचा निर्णय, मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढली
- राष्ट्रवादीचे सहकार पॅनेल जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात
- आम आदमी पक्ष खऱ्या हिंदुत्वाचे अनुसरण करत आहे; केजरीवालांचा दावा


