Share

परमबीर सिंहनंतर आता सीताराम कुंटेंचा खळबळजनक दावा; “मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे..”

Published On: 

मुंबई: परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या खळबळजनक खुलास्यानंतर आता राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Former Chief Secretary Sitaram Kunte ) यांनीही मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Uddhav Thackeray) केलेल्या फोनमुळे परमबीर सिंग यांनी १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द केल्या असल्याचे सीताराम कुंटे यांनी म्हटले आहे.

काही अधिकाऱ्यांनी चार्ज घेतला होता, पण या बदल्या रद्द केल्या गेल्या यावर ईडीच्या प्रश्नावर सीताराम कुंटे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री यांचा फोन आला होता. ह्या बदल्या न करता पूर्वस्थिती ठेवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच याबाबत पोलीस आयुक्तांना सांगा असेही त्यांनी म्हटले. यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आयुक्तांना कळवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या खुलास्यामुळे आता खळबळ माजली आहे.

तसेच अनेक वेळा गृहमंत्री अनिल देशमुख हे अनऑफिशली लिस्ट देत असल्याचेही सीताराम कुंटे यांनी म्हटले आहे.आणि फायनल लिस्टमध्ये त्यातील बहुतेक नावे असायची असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान बदल्यासंबंधी कोणाच्या तक्रारी होत्या आणि का होत्या, याची कल्पना नसल्याचे सीताराम कुंटे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!