Share

‘पार गोदावरी उपसा योजना ३ व ४ त्वरित सुरू करावी’

Published On: 

औरंगाबाद : पार गोदावरी उपसा योजना ३ व ४ त्वरित सुरू करावी, आमदार अंबादास दानवे यांनी अधिवेशनादरम्यान मागणी केली आहे. पार गोदावरी उपसा योजना क्रमांक ३ व ४ चा डीपीआर मंजूर नाही. उच्च न्यायालयीन निर्देश असून सुद्धा दीड वर्ष झाले, तरी या  योजनेचे काम प्रलंबित आहे. मराठवाड्यावर पाण्याविषयी अन्याय का ? असा सवाल आमदार अंबादास दानवे यांनी आजच्या अधिवेशनामध्ये मराठवाड्याच्या मिळणाऱ्या पाण्याविषयी प्रश्न विचारला.

दरम्यान चितळे समितीच्या शिफारसीनुसार वैनगंगा वैतरणा गोदावरी खोऱ्यात पाणी सोडण्यासाठी शासनाने योजना करावी, असे न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. तहीही दीड वर्षापासून डीपी आर मंजूर झालेला नाही. योजना सुर होण्यास वेळ लागत आहे. याकरता राज्य शासनाने पार गोदावरी उपसा योजना क्रमांक ३ व ४ चा तातडीने डीपीआर मंजूर करून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यास मराठवाड्यासाठी ९७ दशलक्ष घनमीटर पाणी मिळू शकते यामुळे मराठवाड्यातील पाण्याचा बिकट प्रश्न सुटू शकतो.असेही शेवटी अंबादास दानवे यांनी या वेळी सवालात मांडला.

यावर जलसंधारण मंत्री जयंत पाटील या यांनी हायकोर्टाच्या निर्णयानंतर या योजनांचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. यात १२ योजना पूर्ण झाल्यात. ११ वळण योजना प्रशासकीय मान्यता मिळण्याची परिस्थिती आहे. अशा एकूण २३ योजनांतून २.४३ टीएमसी पाणी वळवण्याची क्षमता आहे एसएलटीसी मान्यता मिळाली. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट चा सर्वे पूर्ण झाल्या नंतर दोन ते तीन महिन्यात या  योजनांना सुरुवात होईल. त्याचप्रमाणे पार गोदावरी दमणगंगा वैतरणा , गोदावरी दमण गंगा एकतरी योजनेचे नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट असोसिएशन अथोरिटी यांचा सर्वे चालू आहे. तसेच दीड महिन्यात प्रोजेक्ट रिपोर्ट मिळाला की लवकरच काम सुरू करता येईल असे या वेळी जयंत पाटील यांनी उत्तरादरम्यान दिले.

महत्त्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!