Share

विधानसभा अध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीत तू-तू मैं-मैं?

Published On: 

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदावरुन महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास अनुकूल नसल्याची माहिती मिळत होती.

परंतु आता अधिवेशनाच्या अखेरच्या दोन दिवसांत अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. उद्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहिर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या सकाळी तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते निर्णय घेऊन कार्यक्रम जाहिर करणार आहेत. शिवसेना आमदारांना पक्षाकडून व्हीप देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस सभागृह संपेपर्यंत उपस्थिती महत्वाची असणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते होते आग्रही आहेत.

आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरुन चर्चा झाली. या बैठकीत काँग्रेसने अध्यक्ष पदाची निवडणूक याच अधिवेशनात घ्यावी ही भूमिका मांडली आहे. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपलं प्राधान्य सध्या अर्थसंकल्प मंजूर करुन घेणं असल्याचं सांगितलं.

परंतु, काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे, तसेच विरोधा पक्षांकडूनही रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदावरुन महाविकास आघाडी सरकारवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरुन महाविकासआघाडीत एकमत होताना दिसत नाहीये. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदावरुन महाविकास आघाडीत मतभेद झाले आहेत का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!