मुंबई : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून. त्यांच्या चौकशीतून एनआयएला महत्त्वाची माहिती मिळत आहे. NIA च्या अधिकाऱ्यांना वाझेंनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक शर्ट जप्त केला आहे. हे दोन्ही शर्ट गुन्ह्यात वापरले होते.
त्यातील एक शर्ट मुलुंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. त्याच ठिकाणी काल वाझे यांना घेऊन एनआयए अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्याशिवाय NIA ने काल रात्री सचिन वाझेंच्या घराच्या कंपाऊंडमधून एक कार जप्त केली. या कारमध्ये महत्वाचे पुरावे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. NIA कडून आणखी दोन कारचा शोध सुरु आहे.
वाझेंसोबत जो दुसरा व्यक्ती कटात होता त्याचाही शोध लागला असून तो NIA च्या ताब्यात आहे. ती व्यक्ती पोलीस दलातील असल्याची NIA सूत्रांची माहिती आहे. हा संपूर्ण कट पब्लिसीटीसाठी केला असल्याची माहिती सचिन वाझेंनी NIA ला दिली होती. मात्र एनआयए सखोल तपास करत आहे.
सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर NIA च्या तपासाला गती मिळाली आहे. सचिन वाझे यांना ठाणे येथील त्यांच्या घरी NIA च्या टीमने आणून काल झाडाझडती घेतली. रात्री मध्यरात्रीपर्यंत NIA ची टीम सचिन वाझे यांच्या घरातच होती. घरातून काही पुरावेही गोळा केले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत वाढली गुन्हेगारी
- पुण्यात परिस्थिती हाताबाहेर ? महापौरांनी बोलावली तातडीची बैठक…
- सोशल मीडियावर महिलेची बदनामी
- वनिता खरातचा बोल्ड फोटोशूट पुन्हा एकदा चर्चेचा विषय
- ‘जीन्स नाही तुमची बुद्धी फाटलेली आहे’, महुआ मोइत्रांची मुख्यमंत्री रावत यांच्यावर जोरदार टीका


