Share

तहसीलदार ज्योती देवरे सुसाईड ऑडिओ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Published On: 

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे खळबळ उडाली. ‘लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदतीऐवजी मारेकरी पोहोचवले’, असे शल्य व्यक्त करीत ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारे आपली सुसाइड नोट जाहीर केली आहे.

आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांचा संदर्भ देत आपल्याही मनात असाच विचार येत असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यांच्या आरोपांचा रोख पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्यावर आहे. त्यांनी आरोप करताना काही घटनांची उदाहरणेही दिली आहेत. या क्लिपमुळे प्रचंड खळबळ उडाली.

या प्रकरणी आता जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चौकशी समिती नेमली आहे. तसेच समाज माध्यमातून व्हायरल झालेली क्लिप पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची आहे. देवरे यांनी या संदर्भात ८ दिवसांपूर्वी तक्रार केली आहे. त्याची महिला आयोगामार्फत चौकशी सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चौकशी समिती नेमली असून या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशी समितीच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल या अध्यक्ष असून उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील आणि तहसीलदार वैशाली आव्हाड या सदस्य आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!