Share

‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या फक्त ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यास परवानगी असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने लसीकरण करून घेतले आहे. वयोवर्षे ४५ च्या आतील असतानाही तन्मय फडणवीस याने लसीकरण केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे.

त्याने तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. यामुळे त्याचे वय ४५ च्या पुढील नसताना, तो फ्रंट लाईन वर्कर नसतानाही त्याचे लसीकरण कसे झाले ? असे सवाल निर्माण होत आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावर खोचक टीका केली आहे.

‘बाअदब बामुलायजा होशियार शहेनशाह ए हिन्द आलमपनाह नरेंद्र मोदी जी के शागिर्द और मोदीया सल्तनत के सिपासालार देवेंद्र फडणवीस जी के भतीजे नवाबजादे तन्मय फडणवीस जी वैक्सीन लेने पधार रहे हैं। कोई न पुछो उनसे उमर। फडणवीस जी की लगी है जो मुहर। उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है।’ असा घणाघात सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!