Share

नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ

Published On: 

बीड : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या जन आर्शीवाद यात्रेला सोमवारी बीड जिल्ह्यातील परळी इथून सुरुवात झाली आहे. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलून डॉ. कराड यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. परंतू कराड यांनी यात्रेची सुरुवात गोपीनाथगडावरून केल्याने मुंडे समर्थकांची नाराजी दूर होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा यात्रेच्या पहिल्या दिवशीच फोल ठरल्याची दिसून आली.

पंकजा मुंडे यांनी उभारलेल्या गोपीनाथ गडावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन करुन कराड यांनी यात्रेला सुरूवात केली. बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद अशा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा जाणार आहे. पण या यात्रेचा शुभारंभ होताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या बीडच्या कार्यक्रमासाठी निघून गेल्या. भाजपचे परळी येथील कार्यकर्ते कराड यांच्या यात्रेसोबत पुढे गंगाखेड येथे गेलेच नाहीत. त्यांचा सहभाग केवळ परळी येथील शुभारंभा पुरताच राहिल्याचे चित्र दिसून आले.

कराड हे मंत्रिपद मिळाल्यानंतर यात्रेच्या निमित्ताने सोमवारी पहिल्यांदा परळी शहरात आले होते. ते ५० गाड्यांचा ताफ्यासह परळीतील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या यश:श्री निवासस्थानी पोहचले. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता कराड हे प्रभू वैद्यनाथाच्या उत्तर घाटावरील पायरीचे दर्शन घेण्यासाठी गेले. तेव्हा परळीतील भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. गोपीनाथगडावर कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यांनतर ही यात्रा गंगाखेडकडे रवाना झाली.

त्यांनतर पंकजा मुंडे या बीड येथील बूथ कार्यकर्ता मेळाव्याकडे रवाना झाल्या. यावेळी गडावर जमलेले परळीतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते हे कराड यांच्या यात्रेसोबत न जाता पंकजा यांच्या बरोबर बीडकडे रवाना झाले. केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि पक्षाच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांनी पाठ फिरवल्याने अजूनही प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न दिल्याची नाराजी असल्याचे परळीत पाहायला मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!