Share

परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली

Published On: 

परभणी – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध रुग्णालयात घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे अनेकजणांच्या चिंता वाढल्या आहेत . यातच काल वादळी वाऱ्याने परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपलाईन वर झाड कोसळले आणि ऑक्सिजन गळतीला सुरुवात झाली मात्र त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा नार्थ टळला.

परभणी शहरात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या बाजूचे एक झाड कोविड रुग्णांना ऑक्सिजन देणाऱ्या पाइपवर पडले. त्यामुळे ऑक्सिजनची गळती सुरू झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने संबंधित वाॅर्डमधील १४ रुग्णांना दुसऱ्या वाॅर्डमध्ये हलविण्यात आले.

याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर, उप विभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, मनपा आयुक्त देवीदास पवार आदींनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री १२ वाजता गळती रोखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान या घटनेननंतर जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. नाशिक येथील घटनेची पुनरावृत्ती परभणीत टळली अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!