मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यासाबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या घोषणेचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. ‘ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू, असंही म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात; मात्र यापैकी काही झालं नाही”, असा टोला थोरात यांनी लगावला.
सोशल मीडियावरही ‘संन्यास घेईन’ या वक्तव्याची चर्चा सुरू असताना थोरात यांनी आणखीन एका नव्या मुद्द्याची भर घातली आहे. त्यांनी फडणवीसांच्या लग्न करण्याच्या घोषणेचा उल्लेख करून नवीन मुद्दा समोर आणला आहे. यावर भाजप नेते अथवा खुद्द फडणवीस प्रतिक्रिया देतील तेव्हा देतील, पण त्यांनी घोषणा करूनही लग्न का केले की अशी घोषणा केलीच नाही यावर मतमतांतरे सुरू आहेत. तर जाणून घ्या नेमके काय खरे आहे ते.
विकासाच्या बाबतीत विदर्भावर अन्याय
तर त्याचे असे आहे की, २८ सप्टेंबर १९५३ च्या नागपूर करारानुसार विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश झाला होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याची मागणी समोर आलीये. विकासाच्या बाबतीत विदर्भावर अन्याय होत असल्याच्या आरोपातून ही मागणी करण्यात येतेय. कापूस, कोळसा, वीज या तीन घटकांच्या बळावर विदर्भ स्वतंत्रपणे स्वतःचा विकास करू शकेल असा विश्वास विदर्भवाद्यांना आहे.
२००४ मध्ये केली घोषणा
स्वंतत्र विदर्भासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली आहेत. अनेक राजकीय नेतेही या आंदोलनात सहभागी होते. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्षनेते यांनीही स्वतंत्र विदर्भासाठी अनेक आंदोलने केली. आंदोलन भरात असताना २००४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याची घोषणाही केली होती.
‘तू काजोल सारखी दिसतेस!’
पण त्यानंतर काही काळातच देवेंद्र फडणवीस आणि अमृता रानडे यांची पहिली भेट देवेंद्र यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी झाली होती. त्यावेळी पहिल्या भेटीतच दोघांमध्ये तासभर गप्पा रंगल्या. त्यांनतर देवेंद्रांनी अमृताला ‘तू काजोल सारखी दिसतेस’ असे म्हणून प्रपोजही केले. त्यांनतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. देवेंद्र दुसऱ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मार्च २००५ मध्ये दोघांचे लग्न झाले.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा विसर
अमृता यांना पाहिल्यानंतर देवेंद्र यांना त्यांनी केलेल्या घोषणेचा विसर पडला. अगदी त्याचप्रमाणे २०१४ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याचाही विसर पडला आहे. त्यामुळे या कारणामुळे त्यांच्यावर वारंवार टीका होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मुदतवाढ द्या’, राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘वडेट्टीवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजावरचे प्रेम दाखवावे’, निलेश राणेंचे आव्हान
- ‘स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नव्हते ना, त्याचे काय झाले?’, थोरातांचा फडणवीसांना सवाल
- ‘लढवय्ये नेते फडणवीसांची गरज आहे, संन्यास घेऊ देणार नाही’, संजय राऊतांनी केले कौतूक
- ‘इशाऱ्यावर चालणाऱ्याला वाघ नव्हे तर पालतू कुत्रा म्हणतात’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
