Share

आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहिर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मागील वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० जानेवारी २०२१ पर्यंत प्रवेश प्रक्रिया चालली. यंदा मात्र वेळेत प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. संभाव्य वेळापत्रक जाहिर करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.

आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा करण्यात आला आहे. नव्याने आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शाळांना ९ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्यासाठीची मुदत देण्यात आली आहे. तर पालकांना ९ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.

एकदाच आलेल्या अर्जातून सोडत काढण्यात येईल. ५ व ६ मार्च दरम्यान लकी ड्रॉ म्हणेज सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली. यात पात्र पाल्यांच्या पालकांनी ९ ते २६ मार्च दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित करायचे आहेत. यात प्रवेश झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील पहिला टप्पा २७ मार्च ते ६ एप्रिल, दुसरी प्रतिक्षा यादी १२ ते १९ एप्रिल, तिसरी प्रतिक्षा यादी २६ एप्रिल ते ३ मे आणि चौथी प्रतिक्षा यादी १० ते १५ मे दरम्यान प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी दिलेल्या पत्रात दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!