🕒 1 min read
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामाची तयारी सुरु झाली आहे. आगामी हंगामापूर्वी सर्व संघांनी आपल्या काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वृत्तानुसार आयपीएल (IPL) 2021 साठी मिनी लिलाव पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. या लिलावात अनेक परदेशी खेळाडू सहभागी होतील. मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं आयोजन सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. कोरोनाच सावट लक्षात घेता १३ वे हंगाम युएईमधील देशांमध्ये करण्यात आलं होतं. या सत्राचं विजेतेपद मुंबई इंडियन्स या संघाने पटकावलं.
आयपीएल स्पर्धेचा लिलाव येत्या 18 फेब्रुवारीला होणार असला तरीही स्पर्धा कुठे होणार याबाबत अद्याप बीसीसीआयने काहीही जाहीर केलेले नाही. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाची स्पर्धा देखील अमिरातीतच होण्याचे संकेत मिळत आहेत.
बीसीसीआयने आयपीएल 2021च्या ऑक्शनची तारीख व ठिकाण जाहीर केलं. आयपीएल 2021च्या लिलावासाठी ३९ स्वदेशी अन् २२ परदेशी खेळाडूंवर बोली लागणार आहे. या बोली १९६ कोटींपर्यंत असतील. त्याआधी रिटेशनमध्ये सर्व फ्रँचायझींनी मिळून १३९ खेळाडूंना कायम राखले , तर ५७ खेळाडूंना रिलीज केले आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्थानिक मैदानावर आयपीएल आयोजनाचे प्रयत्न केले जातील. असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. कोरोनामुळे आयपीएल २०२० यूएईत झाले होते. पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध मालिकेचे भारतात आयोजन होणार असल्याने आयपीएलचे आयोजन भारतात करण्याचा मार्ग काही प्रमाणात मोकळा झाला आहे. सर्व संघांना खेळाडूंना रिटेन करण्याची तारीख २० जानेवारी देण्यात आली होती. ४ फेब्रुवारीपर्यंत खेळाडूंना एका संघातून दुसऱ्या संघात (ट्रेडिंग विंडो) जाता येणार आहे. बऱ्याच संघांनी आपल्या खेळाडूंना कायम ठेवले आहे तर काहीना संघातून काढण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- आज पासून संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधीपक्षांकडून बहिष्कार !
- तेंडूलकर, द्रविड यांच्या ‘मोठ्या’ विक्रमावर विराटची नजर
- उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयासाठी ६७४ कोटी रुपये निधीची तरतूद
- प्रसिद्ध क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणारा निवृत्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

