🕒 1 min read
नवी दिल्ली: आज पासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील तर 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. सत्राचे दोन भाग असतील. पहिला भाग 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आणि दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होईल. संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) या तारखांची शिफारस केली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांवर चर्चा होईल. यापूर्वी सरकारने कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावले नव्हते. सीसीपीएने म्हटले की, अधिवेशन काळात कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.
या अधिवेशन सत्रादरम्यान काँग्रेससोबत १६ विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते आणि कांग्रेस चे वरिष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांनी ही माहिती दिली.
यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- ‘मुक्कद्दर’ चा सिकंदर स्वप्निल कोलते काळाच्या पडद्याआड !
- ‘दलित महिलांवर अत्याचार झाल्यावर चाकणकर लाली लिपस्टीक लावलेले तोंड घेऊन कुठे लपतात ?’
- पुणे, अहमदाबादमधील आंतरराष्ट्रीय लढतींसाठी क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेशासाठी BCCI चे प्रयत्न
- प्रसिद्ध क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणारा निवृत्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

