Share

तेंडूलकर, द्रविड यांच्या ‘मोठ्या’ विक्रमावर विराटची नजर

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांदरम्यान चेन्नई येथे ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची रंगतदार कसोटी मालिका सुरू होत आहे. या कसोटी मालिकेतून कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.

इंग्लंड टीमही चेन्नईमध्ये दाखल झाली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यानंतर हे खेळाडू हॉटेलच्या दिशेने रवाना झाले. याआधी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे चेन्नईत दाखल झाले. हे दोघेही सध्या क्वारंटाईन आहेत.

या बहुचर्चित कसोटी मालिकेत दमदार फलंदाजी प्रदर्शन करत मोठा विक्रम आपल्या नावे करण्याची विराटकडे सुवर्णसंधी असणार आहे. विराट ठरू शकतो सर्वाधिक शतके करणारा पहिला भारतीय.

२०१२ ते २०१८ या कालावधीत विराटने पाहुण्या इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील १९ सामने खेळले आहेत. या सामन्यातील ३५ डावात फलंदाजी करताना या शिलेदाराने ४२.०६च्या सरासरीने १५७० धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने प्रत्येकी २ शतके आणि अर्धशतके केली आहेत. एवढेच नाही तर, विराटने इंग्लंड संघाविरुद्धच त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २३५ धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी केली होती.

तब्बल ५ शतकांसह विराट कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यासह दिलीप वेंगसरकर आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी ५ शतके केली आहेत.

या विक्रमाच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि भारतीय दिग्गज राहुल संयुक्तपणे अव्वलस्थानी विराजमान आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक ७ कसोटी शतके केली आहेत. तर माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी ६ शतकांसह दुसरे स्थान पटकावले आहे.

जर विराटने इंग्लंड विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत ३ शतके केली तर तो सचिन, द्रविड आणि अझरुद्दीन यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकेल. सोबतच भारताकडून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारा पहिला फलंदाज ठरेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!