नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची केलेल्या अवस्थेवरून अण्णा गप्प का आहेत ? झोपले की काय?’ असे सवाल समाज माध्यमांमधून केला जात आहेत. अशातच एका वृत्तपत्रामध्ये अण्णा हजारेंच्या नावाने खोटी बातमी छापून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात’ या मथळ्याखाली अण्णा हजारेंच्या नावाने एका स्थानिक वृत्तपत्राने बातमी लावली होती. यानंतर शिक्षक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, काही ठिकाणी शिक्षक संघटनांनी निषेध म्हणून आंदोलन देखील केले. मात्र, आता ते वृत्त खोटे असून असे विधान माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्टीकरण अण्णा हजारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.

सदर वृत्तपत्राविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगतानाच त्यांनी शिक्षकांप्रती आपली भावना देखील व्यक्त केली आहे. ‘समाजात शिक्षकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे. नवीन पिढी घडवण्याचे काम शिक्षकच करतात. त्यामुळे समाजात शिक्षकांविषयी आदराची भावना असते. मी देखील शिक्षकांविषयी कायमच आदर व्यक्त केला आहे. मात्र कालच्या वृत्तामुळे मला खेद वाटला. संपूर्ण शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाल्याचे सोशल मीडियावर दिसून आले. द्वेषभावना हि समाज व देशासाठी घातक असून अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन देखील अण्णा हजारे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरलीये, मंत्र्यांची अजून मोठी यादी तयार’; चंद्रकांतदादांच्या विधानाने खळबळ
- ‘सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? शिवसेना खासदार मागच्या दाराने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला’
- ‘सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळेंनी त्यांच्या वडिलांना विचारावे’ ; चंद्रकांत पाटलांचा टोला
- रणरागिणीने फोडली डरकाळी; ‘…अशा लोकांना न घाबरता कारवाई सुरुच ठेवणार’
- ‘होय, हे स्वातंत्र्ययुद्धच ! रँड असाच वागायचा तेव्हा चाफेकर बंधुंनी आवाज उठवला; आताही…’


