🕒 1 min read
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्विकारल्याचे कळवा, असा आदेश काेर्टाने मुंबई महापालिकेला दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. शिंदे आणि भाजपच्या दबावामुळे राजीनामा स्विकारला जात नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला होता. दरम्यान या प्रकरणावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल परब म्हणाले, “रमेश लटके यांच्या निधनानंतर शिवसेनेने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. अतिशय साधे हे प्रकरण होते. पण ऋतुजा लटके यांनी निवडणूक लढवू नये म्हणून शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले गेले. सगळ्या गोष्टी स्पष्ट असताना देखील आम्हाला हायकोर्टात जावं लागल ही दुर्दैवी बाब आहे. एखादी विधवा महिला ज्यावेळी निवडणुकीत उतरते तेव्हा त्यांच्या बाबतीत सहानुभूतीचे धोरण असले पाहीजे.”
खालच्या पातळीचे राजकारण सुरु-
“अगदी सुनावणी सुरू असताना दुपारी महानगरपालिकेच्या वकिलांनी सांगितले की लटके यांच्यावर भ्रष्टाचाराची केस आहे. १२ तारखेला आरोप झाल्याचे सांगितले. पण ऋतुजा लटके तीन तारखेपासून ऑफिसला जात नाही आहेत. हे खालच्या पातळीचे राजकारण सुरु आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेने आज बघितले आहे. परंतु न्यायदेवते आज न्याय दिला”, असे अनिल परब म्हणाले.
निवडणूक बिनविरोध करावी-
“महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे. आतापर्यंत एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आणि पोटनिवडणूक झाली जर त्यांच्या घरचा सदस्य उभा असले. तर महाराष्ट्रात मोठ्या मनाने निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे (शिंदे-फडणवीस) यांनी मोठं मन दाखवावे आणि ही निवडणूक बिनविरोध करावी, तेव्हा महाराष्ट्राच संस्कृती आहे, असे वाटेल”, अशी अपेक्षा देखील अनिल परब यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या :
- Gopichand Padalkar | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे काम रखडले, पडळकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, म्हणाले…
- Breaking News । ऋतुजा लटकेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा ; महापालिकेला राजीनामा मंजूर करण्याचे दिले आदेश
- Diwali 2022 | यावर्षी दिवाळी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त कधी आहे? जाणून घ्या
- Bachchu Kadu | दोन दिवस आधीच शेतकऱ्यांना मदत मिळाली – बच्चू कडू
- Eknath Shinde | शिंदे व उद्धव ठाकरे या दोघांच्या भानगडीत बाळासाहेबांची पुण्याई बंद पडली – एकनाथ खडसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
