Share

Sushma Andhare | सुषमा अंधारेंचे किरीट सोमय्यांना 3 खोचक सवाल! म्हणाल्या, “करोडो रुपयाचा चुरडा…”

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare |  मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) हे 3 महिन्यानंतर कारागृहातुन जमानींनावर सुटून बाहेर आले आहे. यानंतर अनेक नेते, पदाधीकारी हे संजय राऊत यांची भेट घेत आहे. आज विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, (Ambadas Danave) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) तसेच आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांच्यावर जोरदार टीका केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “संजय राऊत  (Sanjay Raut) हे शिवसेना (Shivsena) परीवारातील जेष्ठ नेते आहेत मी धाकटी लेक आहे. त्यांना भेटायची उत्सुकता होती. त्यांच्यावर कारवाई झाली आणि मी पक्षात आले. तोफेकडून टिप्स घेण्यासाठी राऊतांची भेट घेतली. जणेकरुन मी विरोधकांवर अजून चांगला तोफगोळा चालवू शकते. संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.”

“जे लोक संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील मेहंदीवाल्याचा हिशोब मागतात. गजऱ्यावाल्याचा हिशोब मागतात. ते लोक बिकेसी मेळाव्यात जो करोडो रुपयाचा चुरडा केला त्याचा हिशोब कधी देणार आहेत. किरीट भाऊ मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे. भाऊ मी तुम्हाला काहीच वाईट बोलत नाही. पण तुम्ही नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात. तसचे भाजपमधील आणि मित्र पक्षातील नेत्यांना  हिशोब कधी विचारणार?”, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “नोंदणी नसलेल्या पक्षाकडून बीकेसी मैदानावर झालेला खर्च कुणाच्या खिश्यातून झाला यावर किरीट सोमय्या का बोलत नाहीत. भावना गवळी असतील, प्रताप सरनाईक असतील  किंवा यशवंत जाधव असतील यांनी किरीट सोमय्या माफिया म्हणत होते. त्यांच्यावर चार्जशीट कधी दाखल होईल. ‘आपला तो फेकू, दुसऱ्याचा तो पप्पू’ हे करणं किरीट सोमय्यांनी बंद केलं पाहीजे.”

सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली. “महिलांवर अत्याचार, महिलांना काळ फासलं असले, यावर मी फक्त देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारते, की गृह मंत्रालय अस्तित्वात आहे का?. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कामाचा भार जास्त आहे. मला त्यांची खूप काळजी वाटते. गृहमंत्री पद त्यांना झेपत नाही. त्यांनी ते दुसऱ्यांकडे सोपवावे.”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

चित्रा वाघ यांच्यावर देखील सुषमा अंधारे यांनी टीका केली. चित्रा वाघ म्हणतात की संजय राठोड यांचा विषय संपला. हा विषय संपतो कसा? म्हणजे हे क्लिअर आहे की भाजपकडे आले की फाईली बंद होतात. विषय संपतात, वाद संपतात. पण भाजपच्या विरोधात गेले की फाईली उघडतात, विषय उघडतात. भाजपकडून प्रशेर पॉलिटिक्स सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!