Share

Andheri By Election | अंधेरी पोट निवडणुकीत नोटा दोन नंबरला; नेमकं कारण काय?, जाणून घ्या

Published On: 

🕒 1 min read

Andheri By Election | मुंबई : अंधेरी पोट निवडणूकांचा (Andheri By Election) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय झाला आहे. मात्र, या निवडणूकीत नोटाला देखील मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं आहे. यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

नोटाचा अर्थ निवडणुकीत एकही पक्ष पात्रतेचा नाही किंवा त्या निवडणुकीतील एकाही उमेदवाराला आपली सहमती नसेल तर नागरिकांसाठी नोटा हा पर्याय उपलब्ध असतो. नागरीक नोटाचा पर्याय अवलंबून आपली भूमिका मांडू शकतात. अशातच जवळपास साडेबारा हजार पेक्षा जास्त नागरिकांनी नोटाच्या पर्यायाचं बटन दाबलंय.

ऋतुजा यांना जवळपास 60 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी मतदान केलंय. पण जवळपास साडे 12 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी नोटाचं बटन दाबत आपलं रोखठोक मत मांडलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत फक्त 31.74 टक्के नागरिकांनी मतदान केलं होतं. त्यापैकी साडेबारा हजार नागरिकांनी नोटाचं बटन दाबून मतदान केल्याने याबाबतची सध्या जोरदार चर्चा आहे.

यादरम्यान, ठाकरे गटाकडून भाजपवर आरोप केला जातोय. भाजपने नागरिकांना मतदानात नोटाचं बटन दाबण्याचं आवाहन केलं होतं, असा आरोप केला जातोय. पण भाजपकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत.

दरम्यान, भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांनी नोटाला पर्याय निवडण्याचं आवाहन केलं होतं. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. नागरिकांनी नोटाला का जास्त मतदान केलं? याबाबतचा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे की त्यांनी नोटाचं बटण का दाबलं, असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Explained Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या