Share

IPL 2022: “अब ये नॉर्मल है” धोनीची आयपीएल प्रोमो मधील नवीन स्टाईल पाहिलीत का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ ची सुरूवात व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. सर्व संघ तयार आहेत आणि त्यांचे चाहतेही. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी स्पर्धेआधी नव्या अवतारात दिसला आहे. धोनी नेहमीच त्याच्या वेगळ्या लूकमुळे चाहत्यांची मने जिंकतो. आयपीएल सुरू होण्यापूर्वी धोनी नेहमीच आयपीएलचे प्रमोशन करताना दिसतो, त्यामुळे यावेळीही धोनी नव्या लूकमध्ये दिसत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी, त्याच्या अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सचा प्रोमो रिलीज झाला आहे आणि या प्रोमोमध्ये धोनीचा नवीन अवतार दिसत आहे.

धोनीचा नवा अवतार
आयपीएल (IPL) सीझन १५ चा प्रोमो लवकरच रिलीज झाला आहे. प्रसिद्ध झालेल्या promo मध्ये ड्रग लॉर्ड पाब्लो एस्कोबारच्या राजवटीचा अंत करणाऱ्या लोकप्रिय नेटफ्लिक्स शो नार्कोसच्या जेवियर पी पासून प्रेरित एमएस धोनीचा (Ms dhoni) लूक दाखवण्यात आला आहे. धोनीचा हा लूक चाहत्यांनाही फार आवडला आहे. काहींना त्याचा हा लूक रजनीकांतच्या एका जुन्या चित्रपटाची आठवण करून देतोय ज्यात रजनीकांतने बस ड्रायव्हरचा रोल केला होता.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1499629786926235651?t=4WMpDYodp6DMym0eV1dqfw&s=19

महेंद्रसिंह धोनी ७ मार्चपासून सुरतमध्ये CSK सोबत सराव सुरू करणार आहे. ऑक्शनपूर्वीच धोनी चेन्नईला पोहोचला होता आणि त्याने ऑक्शनमध्ये संघाला मदत केली होती. धोनी त्याच्या उत्कृष्ट कौशल्यासाठी आणि स्मार्ट निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. आयपीएल सुरू होण्याआधीच धोनीने पुन्हा एकदा आपल्या मोठ्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. यावेळी बीसीसीआयने आयपीएल २०२२ चा संपूर्ण हंगाम महाराष्ट्रात आयोजित करण्याचा निर्णय घेताच, सीएसकेने आपले सराव सत्र चेन्नईहून सुरतला हलवण्याचा निर्णय घेतला होता. २७ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!