Share

“ओबीसी आरक्षण व निवडणुकीसंदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी”, प्रवीण दरेकरांचा इशारा

Published On: 

मुंबई: २०२२ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन नवाब मलिक यांचा राजीनामा तसेच ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून चांगलेच गाजत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही भाजपने ओबीसी आरक्षण संदर्भात मविआ सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ओबीसी आरक्षण व निवडणुक संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

“ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकार वेळकाढूपणा करीत आहे. या सरकारने ओबीसी आरक्षणाची जवळपास हत्या केली आहे. सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करावी, ओबीसींचे राजकीय आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत”, अशी मागणी दरेकर यांनी सभागृहात लावून धरली.

तसेच “ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात हे सरकार गंभीर नाही. केवळ सरकारच्या निष्काळजीपणामुळे राज्यभरातील ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही सरकारची भूमिका सहानुभूतीची नाही. हे सरकार दडपशाही पद्धतीने काम करत आहे, परंतु कर्मचारी हे सहन करणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय दिलाच पाहिजे किंबहुना आम्ही यासाठी सरकारला धारेवर धरू.”, असा इशारा दरेकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!