पुणे : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे काल भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.
भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.
त्यानंतर यावरून आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली आहे. दरम्यान, या वादावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील आपली रोखठोक प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. मराठा माणसांच्या अस्मितेसाठी आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी देखील याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपला उत्तर देऊ’, असा इशारा परब यांनी भाजपला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुळजाभवानी मंदिर उघडा, अन्यथा आत्मदहन; व्यापऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- १८ जुनचा काळा इतिहास पुसणार का टीम इंडिया ?
- मोदी सरकराचा मोठा निर्णय; खाद्यतेल होणार स्वस्त
- बनावट नंबर टाकून फिरणारा निघाला सराईत वाहनचोर
- मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी निधीची अडचण येऊ देणार नाही – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

