Share

“पुणे महापालिकेवर भगवा फडकवणारच”, संजय राऊतांचा दावा

Published On: 

पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पुणे महापालिका निवडणूक संदर्भात मोठा दावा केला आहे.

पुण्यात एकूण ४२ जागा आहेत. या ४२ जागांवर शिवसेना येणार. पुणे महापालिकेवर भगवा फडकवणारच, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. नगरसेवकांनी सेवक म्हणून काय काम करावे ही बाळासाहेबांची जी संकल्पना होती ते आपले पुण्यातील नगरसेवक करत आहेत. आणि टिकून राहिले. त्यामुळे लढणाऱ्या शिवसैनिकालाच जागा मिळणार. आपण सर्व टिकून राहिलो. जे उडून गेले ते कावळे नाही तर आपण मावळ्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. असे संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला शरद पवार तसेच काँग्रेसचा खंबीर पाठींबा असल्याचे त्यांनी म्हटले. काल सुप्रिया सुळे यांनी पुढचा मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!