मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याच्या कारणास्तव अनिल देशमुख आणि मुलगा हृषीकेश हे सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी गैरहजर राहिले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडीविरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ईडीची कारवाई चुकीची असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, अनिल देशमुखांबाबत ईडीला कोणतीही कल्पना नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख नॉट रिचेबल आहेत. त्यांचा ठावठिकाणा आम्हाला माहीत नाही. ते कुठे आहेत याबद्दल आम्हाला कोणतीही कल्पना नाही. आज आम्ही सु्प्रीक कोर्टाच्या आदेशाची वाट पाहात आहोत. आम्हाला आशा आहे अनिल देशमुख हे चौकशीसाठी सहकार्य करतील अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.
We are not able to connect with him (Anil Deshmukh). We don't know where he is. His exact location is not known. We are waiting for today's Supreme Court order. We hope he will cooperate with the investigation after today's order: ED Sources pic.twitter.com/6MeWxaMP24
— ANI (@ANI) August 3, 2021
अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाण्यास नकार देत काल सोमवारी ईडीला वकिलांमार्फत पत्र दिले होते. यामध्ये त्यांनी याआधी ज्या मागण्या केल्या होत्या त्याच मागण्या आता देखील केल्या आहेत. माझी व्हिडिओ, ऑडिओद्वारे चौकशी करा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. तसंच, मला ECIR ची प्रत द्या किंवा कमीतकमी माझ्याकडून हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी द्या, अशी देखील मागणी केली आहे. दरम्यान, या पत्रात नवा मुद्दा आहे तो म्हणजे ३ ऑगस्टला म्हणजेच उद्या अंतरिम दिलासा मिळावा यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी आहे. त्यामुळे मी चौकशीला हजर राहू शकत नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सलामीवीर मंयक अग्रवाल बाहेर
- शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक
- बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या


