Share

‘अनिल देशमुख लवकर करा कोरोनावर मात, गो कोरोनाची राहिल तुम्हाला साथ’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाल्याची माहिती ५ फेब्रुवारीला मिळाली. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशमुख वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांचा नुकताच आता विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन देखील केलं होत.

यानंतर सर्व नेत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. नुकतंच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनिल देशमुखांना हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत.

‘गृहमंत्री अनिल देशमुखजी आपण लवकर करावी कोरोनावर मात, गो कोरोना या घोषणेची राहील तुम्हाला साथ, कोरोनाने माझा केला होता पिच्छा, तेव्हा तुम्ही दिल्या होत्या मलाही शुभेच्छा, कारण तुम्ही आहात माझे चांगले मित्र, म्हणून मी आज रंगवितो शुभेच्छांचे शब्दचित्र,’ असे ट्विट करत रामदास आठवले यांनी केले आहे.

या ट्विटसोबत त्यांनी आणखी एक ट्वीट करत अनिल देशमुखांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. अनिल देशमुखजी, आप कोरोना से मत डरोना, मैने तो बोला है गो कोरोना, कोरोना से मत हरोना। असे आणखी एक ट्विट आठवलेंनी केले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. काव्यात्मक अंदाजात प्रत्येक गोष्टीवर कोटी करणाऱ्या आठवलेंना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक सदिच्छा दिल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!