मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शनचे दिवस जसे जवळ येत आहेत तसेच कोणता खेळाडू कोणत्या संघात जाणार या चर्चेलाही उधाण आले आहे. नुकतेच ऑक्शन मध्ये असलेल्या खेळाडूंची नावे आणि संघाचे बजेट जाहीर झाले होते. ज्यात सरावात जास्त चर्चा आरसीबीची होत आहे. यंदाच्या हंगामात आरसीबीचे नेतृत्व बदलले आहे. तसेच त्यांनी केवळ ४ खेळाडूंना रिटेन केले आहे. आता मात्र ते अजून ३ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा होत आहे.
मेगा ऑक्शन आधी आरसीबीने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना रिटेन केले होते. तर युझवेंद्र चहल, हर्षल पटेल , देवदत्त पडिकल , के एस भरत , काईल जेम्सन आणि डॅनियल क्रिस्चियन यांसारख्या बड्या खेळाडूंना रिलीज केले होते. रिलीज केल्या खेळाडूंनी गेल्या काही हंगामात आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली होती. आरसीबी हर्षल पटेल , के एस भरत आणि देवदत्त पडिकल यांना पुन्हा संघात आणू शकते असे वृत्त येत आहे. या तिघांनी आरसीबी साठी खेळताना चांगली कामगिरी केली आहे.
आरसीबीकडे मेगा ऑक्शन मध्ये ५७ करोडचे बजेट आहे. नवीन खेळाडूंना खरेदी करण्यासोबतच आता संघाचे नेतृत्व कोण करेल हा गहण प्रश्न सुद्धा फ्रॅंचाईसला पडला आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बँगलोर येथे आयपीएल मेगा ऑक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. २०२२च्या या हंगामात १० संघाचा समावेश असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “ह्याचे डोकं फिरले आहे…”, चंद्रशेखर राव यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा संताप
- “वाईन दुकानांना महाराष्ट्रातच विरोध का?”, विरोधकांना नाथाभाऊंचा सवाल
- कर्नाटकातील ‘त्या’ घटनेवर जितेंद्र आव्हाडांचा संताप; म्हणाले, “फॅशनेबल फाटकी जीन्स घालणार्या मुली..”
- पाकिस्तान सुपर लीगमध्ये शाहिद आफ्रिदीने बनवला लज्जास्पद रेकॉर्ड
- “आमची सत्ता आल्यास अनेकांना जेलची हवा खावी लागेल”, एकनाथ खडसेंचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

