नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) विविध मुद्द्यावरून मोदी सरकारला निशाण्यावर धरत असतात. कधी महागाई, कधी बेरोजगारी तर कधी तरुणांच्या भविष्यावरून मोदी सरकारवर टीका करत असतात. आता त्यांनी ‘मेड इन इंडिया’ या मोहिमेवरून मोदी सरकारवर (Prime Minister Narendra Modi) निशाणा साधला आहे.
भारतासाठी ‘जुमला’ आणि चीनसाठी ‘नोकऱ्या ‘अशी स्थिती केंद्रातील मोदी सरकारने करून ठेवली आहे. मोदी सरकारने असंघटित क्षेत्र आणि सर्वात जास्त नोकऱ्या निर्माण करणारे MSMEs क्षेत्र नष्ट केले आहेत. आणि याचा परिणाम म्हणजे
‘मेक इन इंडिया’ मोहीम म्हणजे ‘चीनकडून खरेदी’ अशी परिस्थिती झाली आहे. मोदी सरकारने २०२१ मध्ये ४६ टक्के आयात चीनकडून केली.बेरोजगारीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. ५० वर्षांतील सर्वात जास्त बेरोजगारी आज भारतात आहे. मोदींनी ‘मेक इन इंडिया’ , ‘स्टार्ट अप इंडिया’ मोहिमेबद्दल गाजावाजा केला. मात्र मोदी सरकरने लघु उद्योग, छोटे उद्योग यांचा पैसा घेऊन लाखो-करोडपती, अब्जपती यांना वाटून दिला. असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
JUMLA for India
JOBS for China!Modi Government has destroyed the Unorganised Sector and MSMEs that create the most jobs.
Result: 'Make In India' is now 'Buy from China' pic.twitter.com/nZRUsYxgkP
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 4, 2022
दरम्यान १ फेब्रुवारीरोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ संसदेत सादर केला. यावरूनही शेतकरी, सामान्य जनता, तसेच तरुणांसाठी अर्थसंकल्पात काहीही केले नसल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे. आता त्यांनी ‘मेड इन इंडिया’ मोहिमेवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रिलीज केलेल्या “या” तीन खेळाडूंना आरसीबी पुन्हा संघात घेणार !
- “ह्याचे डोकं फिरले आहे…”, चंद्रशेखर राव यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा संताप
- “वाईन दुकानांना महाराष्ट्रातच विरोध का?”, विरोधकांना नाथाभाऊंचा सवाल
- कर्नाटकातील ‘त्या’ घटनेवर जितेंद्र आव्हाडांचा संताप; म्हणाले, “फॅशनेबल फाटकी जीन्स घालणार्या मुली..”
- पाकिस्तान सुपर लीगमध्ये शाहिद आफ्रिदीने बनवला लज्जास्पद रेकॉर्ड


