Share

“त्याच्यासाठी आरसीबीने २० कोटी काढून ठेवलेत” माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Published On: 

मुंबई: आयपीएलचे मेगा ऑक्शन १२ आणि १३ फेब्रुवारीला बँगलोर मध्ये होणार आहे.यावेळी १० संघ खेळाडूंची निवड करणार आहेत. विविध देशातील एकूण ५९० खेळाडू ऑक्शनचा भाग असणार आहे. मात्र त्याआधीच खेळाडूंवर अंदाज लावणे सुरु झाले आहे. मेगा ऑक्शन मध्ये मोठ्या खेळाडूंचे नाव आहेत. माजी खेळाडू आकाश चोप्रा याने नुकतेच एका खेळाडूला २० करोड मध्ये खरेदी केले जाणार असलायचा मोठा खुलासा केला आहे.

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलतांना सांगितले. ” माझ्या मते सर्वात महागडा खेळाडू श्रेयस अय्यर असणार आहे. ईशान किशन मोठ्या खेळाडूंच्या यादीत नाही आणि म्हणूनच माझ्या मते श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरेल.ईशान किशनही या यादीत असता तर स्पर्धा रंजक झाली असती. आता अय्यरसाठी खुलेपणाने पैसे खर्च केले जाणार आहे. श्रेयस अय्यर केकेआर किंवा आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो. त्याला खरेदी करायला या संघानी आधीच तयारी केली आहे. मला कोणीतरी सांगितले आहे की आरसीबीने अय्यरसाठी २० कोटी रुपये काढून ठेवले आहेत.”

श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ८७ सामने खेळले असून २३७५ धावा केल्या आहेत. त्याने काही काळ दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवले असून त्याच्या नेतृत्वाखाली संघाला भरपूर यश मिळाले होते. मात्र, येत्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्याला सोडले होते . त्यामुळे जसे आकाश चोप्रा यांनी खुलासा केला आहे , त्याप्रमाणे अय्यरची आता बँगलोर संघाकडून खेळण्याची शक्यता वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!