Share

दोन हजार रुपयांत खोटे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट देणाऱ्याच्या ठाणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Published On: 

ठाणे : दोन हजार रुपयांत खोटे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट (Fake Vaccination Certificate) बनवून देणाऱ्यास ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. अशफाक इफतिकार शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ठाणे पोलिसांना खोटे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट बनवून मिळत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार ठाणे पोलिसांनी सापळा रचत नकली ग्राहक बनून धाड टाकत आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शेख याने आतापर्यंत अनेक नागरिकांना खोटे लसीकरण प्रमाणपत्र वाटप केल्याचा संशय आहे.

ठाणे पोलिसांनी (Thane Police) याबाबत सांगितले, आरोपी अशफाक इफतिकार शेख हा नकली कोविड सर्टिफिकेट देणाऱ्यांच्या टोळीत सहभागी होता. त्यानंतर एक नकली ग्राहक त्याच्याकडे पाठवण्यात आला. आरोपीने या ग्राहकाकडून आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि दोन हजार रुपयांची मागणी केली होती याच्या बदल्यात नकली प्रमाणपत्र देण्याचे त्याने सांगितले. आतापर्यंत अनेक लोकांनी लसीकरण न करता नकली सर्टिफिकेट घेतल्याचे समोर आले आहे. चौकशीतून नकली सर्टिफिकेट मिळवलेल्या लोकांचे नावे समोर येणार आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. असे ठाणे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!