Share

अनिल देशमुखांचा मोठा खुलासा; म्हणाले, “अनिल परब द्यायचे पोलीस बदल्यांची यादी”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former Home Minister Anil Deshmukh) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब मला द्यायचे असा खुलासा केला आहे. (Anil Parab given list of police transfers)असा जबाब त्यांनी ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदवला आहे. आता देशमुखांच्या या खळबळजनक खुलास्यामुळे अनिल परब वादात अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) या पदावर असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा खुलासा सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केला होता. आता अनिल देशमुख यांनी अनिल परब यांचं नाव घेऊन प्रकरणाला नवीन वळण दिले आहे.

दरम्यान अनिल परब यादी कुठून आणायचे? विचारले असता “कदाचित अनिल परब शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे. आमदार त्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांची नावं अनिल परब यांच्याकडे द्यायचे आणि परब ती यादी तयार करुन ते माझ्याकडे द्यायचे”, असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच बदल्यांसंदर्भातील यादी गृह मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार ती दिली होती. या यादीनुसारच बदली करावी. पण जे नियमात बसत असेल तेच करा नाहीतर नावं बाहेर काढा असंही तत्कालीन सचिवांना सांगितलं असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!