Share

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख निर्दोष? सीबीआयने केला खुलासा

Published On: 

नवी दिल्ली : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती. आता सीबीआयच्या प्राथमिक चौकशी अहवालात देशमुख यांना क्लिनचिट देण्यात आल्यासंदर्भात एक अहवाल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत, असे सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

देशामध्ये फेकन्यूज हे व्हायरस सारखे पसरत असल्याचे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले आहे. सत्य समोर आणण्याची जनतेची, माध्यमांची आणि जे सत्तेत आहेत त्यांची जबाबदारी आहे. हा अहवाल खरा की खोटा हे सीबीआयसोडून कुणीही सांगू शकत नाही. सीबीआयने याबाबतील खुलासा करायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली होती.

दरम्यान, या कथित अहवालावरून अनेक राजकीय घडामोडी घडत असताना सीबीआयने या अहवालावर खुलासा केला आहे. पुराव्यांनुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणी अद्याप तपास सुरु असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडून आलेल्या एका पत्रात असे उघड झाले आहे की, काँग्रेसच्या दाव्याप्रमाणे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्राथमिक तपासात क्लीन चिट देण्यात आली नव्हती. त्यामुळे देशमुखांवरील कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!