Share

प्रकरण अंगलट येताच अनिल बोंडेंनी पोलिसांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावरून घेतला यु-टर्न !

Published On: 

अमरावती : ऐनवेळी एमपीएससीच्या परीक्षा आयोगाने पुढे ढकलल्यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजप नेते व माजी मंत्री अनिल बोंडे हे देखील सामील झाले होते. यावेळी, अनिल बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक वादावादी झाली होती.

बोंडेंचा पारा इतका चढला होता की ते या पोलीस अधिकाऱ्याला ‘सरकारचे कुत्रे’ म्हणाले होते. त्यावर पोलिस अधिकाऱ्याने देखील ‘तुम्हीही कुत्रेच आहात,’ असे प्रत्युत्तर बोंडे यांना दिले. याबाबतचा व्हिडीओ देखील स्वतः अनिल बोंडे यांनी ट्विट केला होता. पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याला त्यांनी कुत्रे संबोधल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात होता. भाजपमधील नेत्यांनी देखील त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, अनिल बोंडे यांनी त्या विधानाबाबत खुलासा केला आहे. ते विधान पोलीस विभागाला उद्देशून नसून फक्त त्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल असल्याचं अजब स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. ‘पोलिसांबद्दल मला खूप आदर आहे. पोलिसांनी कोरोनाच्या काळात खूप प्रामाणिक काम केलं आहे. मी त्या अधिकाऱ्याला बोललो संपूर्ण पोलीस विभागाला नाही. अनेक प्रामाणिक अधिकारी आहेत. परंतु, ते आज हतबल आहेत,’ अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

https://twitter.com/DoctorAnilBonde/status/1370003576450396164?s=20

तर, चार दिवसांपूर्वी MPSC च्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करावी. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना लाठ्या मारून वाहनात कोंडून घेऊन जाणारे गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चोरमले यांना निलंबित करावे अशी मागणी देखील डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!