Share

Rakshabandhan | अमरावतीत खासदार अनिल बोंडे यांच्या घरीही रक्षाबंधनाचा उत्साह

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : आज देशभरात भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा करणारा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या घरीही रक्षाबंधनाची लगबग पाहायला मिळत आहे. यावेळी अमरावतीत भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या घरी देखील रक्षाबंधन सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या भगिनी संगीता शिंदेनी यांनी भाऊ अनिल बोंडे यांना राखी बांधली. तसेच पूरग्रस्त बहिणींच्या मदतीला भाऊ धावून जातो आणि पुढेही जाईल, असा विश्वास संगीता शिंदे यांनी व्यक्त केला. तर यावेळी अनिल बोंडें यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शिंदे-फडणवीसांना पोलीस भगिनींनी बांधली राखी
रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनासमोरील पोलीस चौकीत पोलीस भगिनीकडून राखी बांधून घेत आजचा सण साजरा केला. राज्यात युतीच सरकार सत्तेत आल्यापासून पोलिसांच्या घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्राथमिकता दिलेली होती. त्यामुळे हा सण पोलीस भगिनीसोबत साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार संजय शिरसाट हे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!